पोलादपूरमध्ये ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिर’; ४३ सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

0
12

‘स्वच्छता ही सेवा’ व ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत उपक्रम; आरोग्य विमा आणि आभा कार्डची सुविधा

पोलादपूर :
रायगड जिल्हा परिषद, अलिबाग आणि पंचायत समिती पोलादपूर यांच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिर’ आयोजित करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र पालचील आणि ‘आपला दवाखाना’, पोलादपूर यांच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले.
या शिबिरामध्ये पोलादपूर तालुक्यातील ४३ ग्रामपंचायत सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक विविध बाबींविषयी माहिती व मार्गदर्शन देण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांचे आयुष्मान आभा कार्ड काढण्यात आले.
याशिवाय पोस्टल विभागाच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच त्यांना विविध शासकीय आणि सामाजिक सुरक्षा सुविधांशी जोडण्याच्या दृष्टीने हे शिबिर उपयुक्त ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here