कायदेशीर मदत आता व्हॉट्सॲपवर
‘न्याय सेतू’मुळे न्यायप्रक्रिया अधिक सुलभ
मुंबई l प्रतिनिधी
कायदेशीर सल्ला आणि माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना आता कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज राहिलेली नाही. ‘न्याय सेतू – न्याय सुलभता’ या उपक्रमामुळे कायदेशीर मदत थेट नागरिकांच्या व्हॉट्सॲपवर उपलब्ध होत आहे.
या सुविधेमध्ये नागरिकांना केवळ आपला मोबाईल क्रमांक सत्यापित करून एकात्मिक इंटरफेसमध्ये प्रवेश मिळतो. या माध्यमातून कायदेशीर सल्ला, माहिती आणि मार्गदर्शन सहजपणे मिळू शकते. स्मार्ट नेव्हिगेशन प्रणालीमुळे योग्य कायदेशीर मदतीपर्यंत पोहोचणे अधिक वेगवान आणि सोपे झाले आहे.
‘न्याय सेतू’चा उद्देश प्रत्येक नागरिकाला जलद, सुलभ आणि विश्वासार्ह कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे हा असून, डिजिटल माध्यमातून न्यायप्रक्रिया सर्वसामान्यांसाठी अधिक सुलभ करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.


