शनिवार दि. १० सप्टेंबर रोजी पटना, बिहार येथे अखिल भारतीय मागासवर्गीय संघाचे अधिवेशन संपन्न होत आहे. या अधिवेशनात प्रमुख उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून छत्रपती संभाजीराजे उपस्थित राहणार आहेत. १० सप्टेंबर १९४७ रोजी स्थापन झालेल्या या संघटनेचे ७५ वे अमृतमहोत्सवी अधिवेशनात दलित मागासवर्गीय समाजातील घटकांना समाजप्रवाहात आणून त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी जनांदोलन उभारणेत येणार आहे.
अखिल भारतीय मागास संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंद्रकुमार सिंह चंद्रापुरी यांनी महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचे प्रमुख नेतृत्व छत्रपती संभाजीराजे यांना निमंत्रित केले आहे.
त्यागमूर्ती आर. एल. चंद्रपुरी यांचे प्रेरणेतून ‘अखिल भारतीय मागासवर्गीय संघाची स्थापना केली होती’. १०सप्टेंबर १९४७ हा दिवस दलित मागासवर्गीय मुक्ती आंदोलनाचा प्रतिक दिन म्हणून साजरा केला जातो.
दलित मागासवर्गीय व अल्पसंख्याक वर्गामध्ये बंधुभाव आणि एकात्मता निर्माण व्हावी आणि त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तसेच एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी ५२ टक्के आरक्षण देण्यात यावे. यामध्ये येणाऱ्या कोणत्याही कायदेशीर अडचणी दूर करणेत याव्यात. प्रसंगी यासाठी कायदेशीर बदल करावेत. या मागणीसाठी १४ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची मागणी आहे.


