मुंबई–०९-(प्रतिनिधी)- समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या एक वही एक पेन अभियान या उपक्रमात भाजपचे मुंबई अध्यक्ष आ.आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखालील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपला सक्रिय सहभाग नोंदविला आहे:
सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवात बुध्दीच्या देवतेला हारफुलांसह किमान एक वही आणि पेन अर्पण करून श्रीगणेशाचे दर्शन करावे असे आवाहन एक वही एक पेन अभियानच्या वतीने करण्यात आले होते. राज्यातील बहुतांशी मंडळानी व गणेशभक्तांनी हा उपक्रम राबवला
भाजपचे मुंबई अध्यक्ष आ.आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम गणेशोत्सव मंडळाचे यंदा गणेशोत्सवात नेपाळच्या सुप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराचा देखावा साकारला असून या मंडळाचे अध्यक्ष असलेले भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी एक वही एक पेन अभियानचे प्रमुख ज्येष्ठ पत्रकार राजू झनके यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले .आर्थिक दुर्बल व आदिवासी गरजू मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लागावा ही प्रामाणिक भावना घेऊन सुरू करण्यात आलेला एक वही एक पेन उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून आपल्या या अभियानाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा असा सल्लाही शेलार यांनी यावेळी दिला. सदर प्रसंगी आ. शेलार यांनी वांद्रे पश्चिम गणेशोत्सव मंडळाच्या वतीने वह्या आणि पेन सुपूर्द केले.
Attachments area


