सिधुदुर्ग: तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन १२ व १३ सप्टेंबर रोजी

0
121

वेंगुर्ला प्रतिनिधी – जिल्हा परिषद सिधुदुर्ग व वेंगुर्ला पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यावतीने ४९वे वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन १२ व १३ सप्टेंबर या कालावधीत वेंगुर्ला येथील मदर तेरेसा स्कूल येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन १२ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते व गटविकास अधिकारी विद्याधर सुतार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

      सोमवार दि. १२ रोजी सकाळी ९ वाजता विज्ञान प्रदर्शन प्रतिकृती सहभाग नोंदणी, प्रदर्शन साहित्य मांडणी, लहान व मोठ्या गटासाठी निबंध तसेच वक्तृत्व स्पर्धा, दुपारी २.३० वाजता होणा-या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनला जिल्हापरिषद सिधुदुर्गचे प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.मुश्ताक शेख व मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे आदी उपस्थित राहणार आहेत. मंगळवार दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता विज्ञान मेळावा, विज्ञान नाट्योत्सव, प्रतिकृती परिक्षण, दुपारी ३ वाजता पारितोषिक वितरण व समारोप होणार आहे.

      तरी या विज्ञान प्रदर्शनाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक करावे असे आवाहन विस्तार अधिकारी (शिक्षण), सर्व केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सर्व तालुका संघटना प्रतिनिधी, मदर तेरेसा इंग्लिश मिडियम स्कूल व पंचायत समिती शिक्षण विभाग कर्मचारी यांच्यावतीने मुख्याध्यापक फादर अॅन्थोनी डिसोजा आणि गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here