परुळेबाजार येथे ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न 

0
49

परुळेबाजार येथे ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न 

परुळेबाजार, वार्ताहर:
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती वेंगुर्ला, ग्रामपंचायत परुळेबाजार व NDRF टीम, 5 बटालियन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने परुळेबाजार येथे ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला NDRF पुणे टीमचे इन्स्पेक्टर ऋषभ शर्मा तसेच सब इन्स्पेक्टर नरेंद्र सिंह व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी करावयाचे प्रयत्न व उपाययोजना याबाबत तज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी परुळेबाजारच्या सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच प्राजक्ता पाटकर, सदस्य प्रदीप प्रभू, पुरुषोत्तम प्रभू, कोचरा सरपंच उदय गोवेकर, उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, पोलीस पाटील संदेश पवार, श्वेता चव्हाण, जान्हवी खडपकर, ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांच्यासह संतोष पिंगुळकर, नवार भाऊ, राऊळ भाऊ, सायली सातोसे, गडेकर भाऊ, अंगणवाडी सेविका, बचतगट प्रतिनिधी, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here