पाली आदर्श विद्यामंदिरात उत्साहात शाळा प्रवेशोत्सव
पाली आदर्श विद्यामंदिरात उत्साहात शाळा प्रवेशोत्सव
चिमुकल्यांचे जल्लोषात स्वागत; दर्जेदार शिक्षणासाठी शासन कटिबद्ध
रत्नागिरी : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श विद्यामंदिर, पाली नं. १ येथे विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. नव्याने शाळेत दाखल झालेल्या चिमुकल्यांचे स्वागत करताना आनंदमय वातावरण निर्माण झाले.
यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांच्या भावी शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थितांशी संवाद साधताना शासकीय शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले. शासकीय शाळांचा विकास आणि विद्यार्थ्यांचे हित ही महायुती सरकारची प्राथमिकता असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
प्रवेशोत्सव कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.