‘पुणे ग्रँड टूर’च्या अंतिम टप्प्याचा थाटात शुभारंभ

0
44
‘पुणे ग्रँड टूर’च्या अंतिम टप्प्याचा थाटात शुभारंभ
‘पुणे ग्रँड टूर’च्या अंतिम टप्प्याचा थाटात शुभारंभ

‘पुणे ग्रँड टूर’च्या अंतिम टप्प्याचा थाटात शुभारंभ; पुण्याचे नाव जागतिक क्रीडा नकाशावर

पुणे : ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या अंतिम टप्प्याचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे–बालेवाडी येथे झेंडी दाखवून करण्यात आला.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन करत दर्जेदार पायाभूत सुविधा उभारल्या असून, केंद्र सरकारसह देश-विदेशातील सायकलपटूंनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. या स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले असून, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे प्रभावी आयोजन करण्याची पुण्याची क्षमता सिद्ध झाल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

जागतिक स्तरावरील खेळाडूंना एकत्र आणत क्रीडा पर्यटनाला चालना देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न ‘पुणे ग्रँड टूर’च्या माध्यमातून करण्यात आला आहे. भारत क्रीडा पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून पुढे येत असल्याची ही सकारात्मक चिन्हे असून, हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले.

यावेळी प्रसिद्ध अभिनेता अमीर खान यांनीही उपस्थित राहून ‘पुणे ग्रँड टूर’च्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. या स्पर्धेमुळे क्रीडा, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा मिळाल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here