पुणे पत्रकार कट्टातर्फे ४ ऑक्टोबरला ‘संवादातून परिवर्तन’ कार्यशाळेचे आयोजन
पुणे पत्रकार कट्टातर्फे ४ ऑक्टोबरला ‘संवादातून परिवर्तन’ कार्यशाळेचे आयोजन
पुणे :
पुणे पत्रकार कट्टातर्फे रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी ‘संवादातून परिवर्तन’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता डेक्कन चिमखाना येथील रानडे इन्स्टिट्यूटमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
पुणे पत्रकार कट्ट्याचा हा ३०वा कट्टा असून, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत अन्वर राजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संवादाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाच्या विविध पैलूंवर या कार्यक्रमात विचारमंथन होणार आहे.
पत्रकारिता, सामाजिक क्षेत्र आणि सार्वजनिक जीवनाशी संबंधित व्यक्तींसाठी हा कार्यक्रम संवाद आणि विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी ठरणार आहे.