पुणे-पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरण : दोषींवर कठोर कारवाई होणार- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

0
89

पुणे, प्रतिनिधी : पुणे शहरातील हडपसर तसेच पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू सेवनामुळे १२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून या प्रकरणातील कोणत्याही दोषीची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट करत Sunetra Ajit Pawar यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे व पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला.
या दुर्घटनेच्या मुळाशी जाऊन तपास करण्यात यावा तसेच अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली असून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संयुक्त तपास सुरू आहे. विषारी दारूचा पुरवठा नेमका कोठून झाला, त्यामागे कोणाचा सहभाग आहे आणि संपूर्ण साखळी कशी कार्यरत होती, याचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत.
राज्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर आणि जीवघेण्या कृत्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नसून दोषींविरोधात कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, या घटनेमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ उडाली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तपास यंत्रणा संपूर्ण प्रकरणाचा विविध अंगांनी तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here