दापोडी विषारी दारू प्रकरणातील मृतांच्या कुटुंबियांना मदत द्या; दोषींवर कठोर कारवाई करा – शशिकांत शिंदे

0
87

मुंबई/पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी :
पिंपरी-चिंचवडमधील दापोडी परिसरात विषारी दारू सेवनामुळे १५ नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत Shashikant Shinde यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मृतांच्या कुटुंबियांना तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अवैध धंदे रोखण्यात सरकार अपयशी ठरत असेल तर नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात शिंदे म्हणाले की, दापोडी परिसरासह हडपसर, काळेपडळ आदी भागांमध्ये अनेक वर्षांपासून अवैध देशी दारू विक्री सुरू होती. या विषारी दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे.
शिंदे यांनी आरोप केला की, काही अवैध व्यवसाय पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि कथित हप्तेखोरीमुळे सुरू राहिले आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर बनला असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच सत्ताधारी नेते आणि कार्यकर्ते पोलिसांचा वापर राजकीय हेतूंसाठी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी, अवैध दारू विक्रेते, तसेच त्यांना संरक्षण देणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. मृतांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करून न्याय द्यावा, असेही ते म्हणाले.
दापोडी येथील घटनेमुळे राज्यातील अवैध मद्यविक्री आणि त्यावरील नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here