‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’ समारोप समारंभात कृषी नवकल्पनांना चालना

0
49
‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’ समारोप समारंभात कृषी नवकल्पनांना चालना
‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’ समारोप समारंभात कृषी नवकल्पनांना चालना
‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’ समारोप समारंभात कृषी नवकल्पनांना चालना

स्पर्धा पुढील वर्षापासून राज्यव्यापी – मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’चे पारितोषिक वितरण व समारोप समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) , मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane),खासदार डॉ. मेधा कुलकर्णी,(Medha Kulkarni)आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar), आमदार हेमंत रासने(Hemant Rasane) , यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेती अधिक शाश्वत, तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम करण्यासाठी आधुनिक संशोधन व नवकल्पनांची जोड आवश्यक असल्याचे सांगितले. कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी व्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांनी पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या नावाने दिला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

राज्य शासनाचा कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगताना, या स्पर्धेमागे दिवंगत अजित पवार यांचे विशेष योगदान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

यंदाच्या स्पर्धेसाठी तब्बल १ हजार २९० अर्ज प्राप्त झाले. विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण प्रकल्पांनी परीक्षक आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या वर्षीच्या स्पर्धेतील चार संशोधन प्रकल्पांचे उत्पादन प्रत्यक्षात सुरू झाले असून आणखी १२ उत्पादने लवकरच बाजारात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या स्पर्धेतून केवळ कल्पना मांडल्या जात नाहीत, तर त्या प्रत्यक्ष उत्पादनात उतरून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवतात, असे मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

यंदाच्या स्पर्धेतील १८ निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन देण्यात येणार असून त्यापैकी किमान १२ प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here