बदलापूर पोलिसांच्या वेगवान तपासामुळे हरवलेले सोन्याचे दागिने मिळाले परत
बदलापूर पोलिसांच्या वेगवान तपासामुळे हरवलेले सोन्याचे दागिने मिळाले परत
बदलापूर:
बदलापूर पश्चिम पोलिस (Badlapur West Police Station ) यांच्या तांत्रिक तपासामुळे रिक्षामधून हरवलेले अंदाजे ₹७ लाख ५० हजार किमतीचे सोन्याचे दागिने शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी हे दागिने मूळ मालकाला सुरक्षितपणे परत केले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीचे सोन्याचे दागिने रिक्षातून प्रवास करताना हरवले होते. घटनेची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिसांनी तात्काळ तांत्रिक तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दागिन्यांचा मागोवा घेत अखेर ते हस्तगत केले.
पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि प्रभावी तपासामुळे मौल्यवान दागिने परत मिळाल्याने संबंधित कुटुंबाने समाधान व्यक्त केले आहे. या कारवाईमुळे बदलापूर पश्चिम पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.