पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश
पुणे शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी पक्षाच्या वतीने सर्वांचे मनापासून स्वागत करण्यात आले असून, त्यांच्या पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
पक्षाची जनकल्याणकारी विचारधारा नव्याने प्रवेश केलेले सहकारी सक्षमतेने आणि बांधिलकीने पुढे नेतील, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. या प्रवेशामुळे पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.


