तासगावमध्ये संजयकाका पाटील यांचे पुनरागमन,
आळंदीत भाजपचा दणदणीत विजय
विधानसभा निवडणुकीतील सलग दोन पराभवानंतर तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत संजयकाका पाटील यांनी दमदार पुनरागमन केले आहे. स्वाभिमानी विकास आघाडीने थेट नगरपालिका सत्ता काबीज करत आमदार रोहित पाटील यांच्या गटाला, म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला. २४ जागांच्या नगरपालिकेत स्वाभिमानी विकास आघाडीने १३ जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ११ जागांवर समाधान मानावे लागले. नगराध्यक्षपदी स्वाभिमानी विकास आघाडीच्या विजया पाटील विजयी झाल्या. निकाल जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष केला.
दरम्यान, आळंदी नगर परिषदेत भाजपने २१ पैकी १५ जागा जिंकून आणि नगराध्यक्षपद मिळवून दणदणीत विजय नोंदवला आहे. हा निकाल उत्तर पुणे जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, भाजपचे आमदार व निवडणूक प्रभारी महेश लांडगे यांनी हा कौल विकासकेंद्रित प्रशासनासाठी जनतेने दिलेला असल्याचे म्हटले आहे.


