वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा, कणकवली नगर परिषदेत पाठिंबा दिलेल्या शहर विकास आघाडीचे 8 उमेदवार विजयी |

0
284
वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा, कणकवली नगर परिषदेत पाठिंबा दिलेल्या शहर विकास आघाडीचे 8 उमेदवार विजयी
वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा, कणकवली नगर परिषदेत पाठिंबा दिलेल्या शहर विकास आघाडीचे 8 उमेदवार विजयी

वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा | कणकवली नगर परिषदेत पाठिंबा दिलेल्या शहर विकास आघाडीचे 8 उमेदवार विजयी |

नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार संदेश भाई पारकर यांच्यासह सर्व उमेदवारांचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांनी केले अभिनंदन.!

कणकवली |
वंचित बहुजन आघाडीने कणकवली नगर परिषद च्या निवडणुकीत शहर विकास आघाडीला पक्षाचे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा निरीक्षक डॉ.सुशिम सकपाळ यांच्याशी चर्चा करुन जाहीर पाठिंबा दिला होता हा पाठिंबा देताना घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संदेश भाई पारकर हे जनतेच्या मनातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत.आणि त्यांचा विजय निश्चित असल्याचे ठाम मत वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांनी व्यक्त केले होते आज कणकवली शहरातील जनतेने संदेश भाई पारकर यांच्या नगराध्यक्ष पदाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी व्यक्त केली आहे.

कणकवली शहरातील 17 जागांपैकी वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेल्या आठ जागांवर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह नगरसेवक निवडून आलेले आहेत नगराध्यक्ष संदेश भाई पारकर यांच्यासह या विजयी उमेदवारांची कणकवली शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शिक्षण तज्ञ विश्वनाथ कदम सर जिल्हा महासचिव उत्तम जाधव अँड.सुदिप कांबळे यांनी नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार संदेशभाई पारकर,वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार लुकेश कांबळे हे ही विजयी झाले आहेत.
या आठ ही उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

विजयी मिरवणुकीत वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,छत्रपती शिवाजी महाराज की जय,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा गगनभेदी घोषणा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या विजय मिरवणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी गळ्यात मफलर आणि वंचित बहुजन आघाडीचे झेंडे फडकावले
भारतीय बौद्ध महासभेचे कणकवली तालुका सरचिटणीस सुभाष जाधव, जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष भीमराव जाधव, प्रभाकर कदम, वैभव साळीस्तेकर,सुजन कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी आपली 19 डिसेंबर ला सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली आहे.परंतु कणकवली नगरपंचायत.निवडणूकीची प्राथमिक प्रक्रिया त्या आधीच पुर्ण झाली होती असे ही जिल्हाध्यक्ष समाजभूषण तानाजी कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here