पुरंदर विमानतळ उभारणीला गती द्या  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
35
पुरंदर विमानतळ उभारणीला गती द्या  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुरंदर विमानतळ उभारणीला गती द्या  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुरंदर विमानतळ उभारणीला गती द्या  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे शहर व परिसरात वेगाने होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे हा भाग गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनत असून, त्यामुळे औद्योगिकरण व नागरीकरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढत आहे. भविष्यातील पुणे शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमान -तळाची निर्मिती करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या पुरंदर विमानतळ कामाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. विमानतळासाठी आवश्यक असलेले भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून ठरावीक कालमर्यादेत पूर्ण करून विमानतळ विकासाचा महत्त्वाचा टप्पा पार करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पुरंदर विमानतळाच्या उर्वरित भूसंपादनासाठी एमआयडीसीने तातडीने अधिसूचना काढावी, तसेच निधी उपलब्धतेबाबत ठोस व विशिष्ट कार्यपद्धती निश्चित करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील विमानतळांच्या विकासाची जबाबदारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे असून, कंपनीची क्षमता वृद्धी करून राज्यातील सर्व निर्माणाधीन विमानतळांचा विकास या कंपनीकडेच सोपवण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. पुरंदर विमानतळाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्धतेचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, प्रधान सचिव (उद्योग) पी. अन्बळगन, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसू आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनीही बैठकीत सहभाग घेतला.

पान ४ वर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here