बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार संस्थेतर्फे विनामूल्य स्वरोजगार प्रशिक्षण

0
25
बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार संस्थेतर्फे विनामूल्य स्वरोजगार प्रशिक्षण
बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार संस्थेतर्फे विनामूल्य स्वरोजगार प्रशिक्षण

बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार संस्थेतर्फे विनामूल्य स्वरोजगार प्रशिक्षण

बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (RSETI) यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध विनामूल्य प्रशिक्षण कार्यक्रमांना जिल्ह्यातून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. याचाच भाग म्हणून एक महिना कालावधीचे एम्ब्रॉयडरी, आरी वर्क व फॅब्रिक पेंटिंग या प्रशिक्षणाची यशस्वी सांगता प्रशिक्षणार्थींनी साकारलेल्या वस्तूंच्या विक्री प्रदर्शनाने करण्यात आली. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांना प्रत्यक्ष विक्रीचा अनुभव मिळाला असून, त्यांना विक्री व्यवस्थापन व ग्राहकांशी व्यवहार करण्याचे महत्त्वाचे धडे गिरवता आले.

बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयाच्या आवारात शनिवारी सकाळी हे विक्री प्रदर्शन भरविण्यात आले. ३१ दिवस चाललेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता प्रदर्शनाद्वारे करण्यात आली. या संपूर्ण कालावधीत प्रशिक्षिका सौ. तृप्ती पतंगे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान महिलांना एम्ब्रॉयडरी आणि फॅब्रिक पेंटिंगच्या विविध पारंपरिक तसेच आधुनिक शैलींचे सखोल ज्ञान देण्यात आले.

एम्ब्रॉयडरी प्रशिक्षणामध्ये हॅंड एम्ब्रॉयडरी, शॅडो वर्क, पॅचवर्क, कट वर्क, जर्दोसी, रिबन वर्क, मिरर वर्क तसेच आरी वर्क यांचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. तसेच पारंपरिक एम्ब्रॉयडरी प्रकारांमध्ये कांथा, कच्छ, चिकनकारी, कमल कडाई यांचे प्रशिक्षण देण्यात आले. विविध

एम्ब्रॉयडरी स्टीचेसमध्ये रन, बॅक, स्टेम, क्रॉस यांचेही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.फॅब्रिक पेंटिंग विभागात नीब पेंटिंग, थ्री-डी पेंटिंग, बटिक, ब्लॉक पेंटिंग, स्प्रे पेंटिंग या आधुनिक तंत्रांसह वारली, मधुबनी, कलमकारी, पिचवाई आणि कॅनव्हास पेंटिंग यांसारख्या पारंपरिक व लोककलेच्या शैलींचेही प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे महिलांच्या कलागुणांना चालना मिळाली असून, त्यांनी तयार केलेल्या साड्या, कापडी पिशव्या, पेंटिंग्स आणि सजावटीच्या वस्तूंना प्रदर्शनात चांगली मागणी मिळाल.

या प्रदर्शनास बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक नरेंद्र देवरे आणि उपविभागीय व्यवस्थापक अंजनीकुमार सिंग आझाद यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थींनी साकारलेल्या कलाकृतींचे कौतुक केले. त्यांनी महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी प्रदर्शनातील पेंटिंग्स, साड्या, कापडी पिशव्या आदी वस्तूंची खरेदी करून प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहन दिले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here