पोलीस कर्तव्य मेळाव्यात प्रशांत ढावरे यांना सुवर्णपदक; सूरज गायकवाड रौप्य, दीपक शिखरे कांस्यपदकाचे मानकरी

0
10
२१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६.
२१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६.

पोलीस कर्तव्य मेळाव्यात प्रशांत ढावरे यांना सुवर्णपदक; सूरज गायकवाड रौप्य, दीपक शिखरे कांस्यपदकाचे मानकरी

पुणे :
२१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ मध्ये ‘सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन’ अंतर्गत घेण्यात आलेल्या ‘क्राईम इन्व्हेस्टिगेशन, क्रिमिनल लॉ, रुल्स अँड प्रोसीजर अँड कोर्ट जजमेंट’ या उपस्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
या स्पर्धेत नागपूर शहरातील पोलीस निरीक्षक प्रशांत ढावरे यांनी सुवर्णपदक पटकावले. मुंबई शहरातील सहायक पोलीस निरीक्षक सूरज गायकवाड यांनी रजतपदक, तर नवी मुंबईतील पोलीस निरीक्षक दीपक शिखरे यांनी कांस्यपदक मिळविले.
तिन्ही पदकविजेत्यांनी तपास प्रक्रियेशी संबंधित ज्ञान, गुन्हे अन्वेषण, फौजदारी कायदा, नियम व कार्यपद्धती तसेच न्यायालयीन निर्णयांच्या अभ्यासावर आधारित या स्पर्धेत आपले कौशल्य सिद्ध केले.
पदकविजेत्या प्रशांत ढावरे, सूरज गायकवाड आणि दीपक शिखरे यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here