रायगड पोलीस दलाची अभिमानास्पद कामगिरी; पो.ह.वा. एस. के. पाटील यांना कांस्यपदक
रायगड पोलीस दलाची अभिमानास्पद कामगिरी; पो.ह.वा. एस. के. पाटील यांना कांस्यपदक
रायगड :
२१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा–२०२६ मध्ये रायगड पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. या मेळाव्यातील Scientific Aid to Investigation अंतर्गत घेण्यात आलेल्या Observation Test या उपस्पर्धेत रायगड पोलीस दलातील पोलीस हवालदार एस. के. पाटील यांनी कांस्यपदक पटकावले.
पोहवा. एस. के. पाटील यांनी या स्पर्धेत कोकण परिक्षेत्राचे प्रतिनिधित्व केले. तपासासाठी आवश्यक निरीक्षण कौशल्याचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उपस्पर्धेत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रायगड पोलीस दलातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
पोहवा. एस. के. पाटील यांच्या या यशामुळे रायगड पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी रायगड पोलीस दलाकडून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.