पोषणातून आरोग्याचा संदेश; वाकवलीत राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम उत्साहात

0
27

दापोली | प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत दापोली तालुक्यातील दाभोळ प्रकल्पाच्या वाकवली बीटमध्ये नववा राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. बालके, माता तसेच ग्रामस्थांमध्ये सकस व संतुलित आहाराबाबत जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. प्रवेशद्वारावर पाहुण्यांचे औक्षण करून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमस्थळी विविध पौष्टिक आहारांच्या पाककृतींचे आकर्षक प्रदर्शन भरवण्यात आले होते. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉलही उभारण्यात आले होते.
पोषणातून आरोग्याचा संदेश; वाकवलीत राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम उत्साहात
पोषणातून आरोग्याचा संदेश; वाकवलीत राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम उत्साहात
अंगणवाडी सेविकांनी विविध पोषणयुक्त धान्यांचा वापर करून साकारलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रदर्शनाच्या माध्यमातून स्थानिक व पौष्टिक खाद्यपदार्थांचा दैनंदिन आहारात समावेश करण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई यांनी जंक फूड व फास्ट फूडच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देत उपस्थितांमध्ये जनजागृती केली. पंचायत समिती सदस्य निलेशजी शेठ यांनी भरड धान्यांचे महत्त्व सांगून त्यापासून शरीराला मिळणाऱ्या विविध पोषणमूल्यांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका कांबळे मॅडम यांनी केले. पवार मॅडम तसेच सी.एच.ओ. ढाकणे सर यांनी आहार, आरोग्य आणि वैयक्तिक स्वच्छता याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाकवली बीटमधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले. पोषण, आरोग्य आणि स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी या उपक्रमातून प्रभावी जनजागृती करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here