पोषण आहार तांदूळ चोरीप्रकरणी कारवाईला विलंब

0
35
पोषण आहार तांदूळ चोरीप्रकरणी कारवाईला विलंब
पोषण आहार तांदूळ चोरीप्रकरणी कारवाईला विलंब

पोषण आहार तांदूळ चोरीप्रकरणी कारवाईला विलंब

नाटेनगर विद्यालयात पालक–ग्रामस्थांचे शाळाबंद आंदोलन

राजापूर l प्रतिनिधी

राजापूर तालुक्यातील नाटे येथील नाटेनगर विद्यामंदिर व कला-वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालयात पोषण आहारातील तांदूळ चोरीचे प्रकरण काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. या प्रकरणात मुख्याध्यापक व उपशिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले असतानाही प्रत्यक्ष कारवाईला विलंब होत असल्याचा आरोप पालक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त पालक व ग्रामस्थांनी बुधवारपासून शाळाबंद आंदोलन सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुमारे दीड वाजता नाटेनगर विद्यालयाच्या गोदामातून पोषण आहारासाठीचा तांदूळ चोरीला जात असताना, जागरूक नागरिकांनी संबंधित वाहन अडवून नाटे पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या प्रकरणी ग्रामस्थ मकरंद धाक्रस यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून वाहन चालक कुणाल अनिल थळे श्री व सुनील वसंत डुगीलकर, तसेच शाळेचे सहाय्यक शिक्षक नाना बीरा करे आणि मुख्याध्यापक रवींद्र जाधव यांच्या विरोधात नाटे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून आदेश होऊनही कारवाई रखडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here