प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे महसूल अधिकाऱ्यांना निर्देश

0
7
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न.

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे महसूल अधिकाऱ्यांना निर्देश

ओरोस :
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (Trupti Dhommise) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार (दि. २८ जुलै) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकाऱ्यांची सर्वंकष आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत महसूल विभागाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांचा तालुकानिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत आंबा-काजू नुकसान भरपाई, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (SIR), बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा, प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे तसेच महसूल विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रत्येक तालुक्यातील कामकाजाची सखोल समीक्षा करत प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले. तसेच नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा वेळेत, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ यशस्वी राबविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे आणि शिबिरांद्वारे नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवाव्यात, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here