बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या रोपवाटिकेला NHBचे ३-स्टार मानांकन

0
35
बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या रोपवाटिकेला NHBचे ३-स्टार मानांकन
बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या रोपवाटिकेला NHBचे ३-स्टार मानांकन

बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या रोपवाटिकेला NHBचे ३-स्टार मानांकन

बारामती l प्रतिनिधी

ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेन्ट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथील फळपिक रोपवाटिकेला राष्ट्रीय बागवानी बोर्ड (NHB), गुरगाव (हरियाणा) यांच्याकडून सर्वोच्च ३-स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. या मानांकनाअंतर्गत १२ फळपिकांच्या एकूण १८ वाणांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.

या मानांकनामुळे रोपवाटिकेतील रोपे गुणवत्ता -पूर्ण, रोगमुक्त व शास्त्रीयपद्धतीने तयार केली जात असल्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार फळपिकांची रोपे उपलब्ध होणार असून, फलोत्पादन क्षेत्राला मोठे बळ मिळणार आहे.

कृषी विज्ञान केंद्राच्या या यशाबद्दल शेतकरी, कृषी तज्ज्ञ व कृषी क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत असून, बारामती परिसरातील फळउत्पादन विकासाला यामुळे नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली

जात आहे. या रोपवाटिकेमार्फत आंबा, डाळिंब, पेरू, मोसंबी, संत्रा, लिंबू, पपई, केळी यांसारख्या प्रमुख फळपिकांसह विविध सुधारित वाणांची शास्त्रीय पद्धतीने निर्मिती केली जाते. आधुनिक तंत्रज्ञान, मातृवृक्षांची निवड, नियमित तपासणी आणि काटेकोर नोंदवही व्यवस्थापनामुळे रोपांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यात येत आहे.

राष्ट्रीय बागवानी बोर्डकडून दिले जाणारे ३-स्टार मानांकन हे रोपवाटिकेच्या पायाभूत सुविधा, तांत्रिक मनुष्यबळ, उत्पादन प्रक्रिया, रोगनियंत्रण व वितरण व्यवस्थेच्या सखोल तपासणीनंतर प्रदान केले जाते.

या मान्यतेमुळे या मान्यतेमुळे , शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ होईल. फलोत्पादन क्षेत्रात नवउद्योजक, महिला बचत गट व युवकांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राची भूमिका अधिक बळकट होणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here