बालविवाह मुक्त अभियान रथ
ठाणे : बालविवाह प्रतिबंधासाठी सुरू केलेल्या ‘बालविवाह मुक्त महाराष्ट्र’ अभियानाच्या प्रचार रथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नमिता शिंदे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे रामकृष्ण रेड्डी, पल्लवी जाधव, संरक्षण अधिकारी रेखा हिरे, सखी केंद्र प्रतिनिधी, विशेष बाल विकास पोलिस अधिकारी, चाईल्ड लाईन ठाणे तसेच MSVT/सेवा संस्थेचे संस्थापक अशोक पवार, रामेश्वर भाले, वैभव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
अभियानाचा उद्देश बालविवाहास विरोध, जनजागृती वाढवणे आणि कायद्याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे हा आहे.

