संसदीय अभ्यासवर्ग उद्घाटन
मुंबई : राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात करण्यात आले. भारतीय लोकशाहीची रचना नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी असून, संविधानातील प्रक्रिया समजून घेण्यासाठी हा अभ्यासवर्ग महत्वाचा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
भारतीय प्रजासत्ताकाला ७५ वर्ष पूर्ण होत असताना सुरू झालेला हा अभ्यासवर्ग लोकशाही बळकटीसाठी उपयुक्त असल्याचे विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी नमूद केले. सभागृहाचे कामकाज आणि संविधानातील तरतुदींची अंमलबजावणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहता येणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
विद्यार्थी, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसाठी हा उपक्रम ज्ञानवर्धक आणि उपयोगी असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, डॉ. नीलम गोऱ्हे, अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि सचिव मेघना तळेकर उपस्थित होते.


