बेळणे खुर्दमध्ये भातशेतीची पाहणी; बाधित शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही

0
5
बेळणे खुर्दमध्ये भातशेतीची पाहणी; बाधित शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही
बेळणे खुर्दमध्ये भातशेतीची पाहणी; बाधित शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही

बेळणे खुर्दमध्ये भातशेतीची पाहणी; बाधित शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही

सिंधुदुर्ग :
पावसाचा प्रदीर्घ खंड आणि पाण्याअभावी जिल्ह्यात भातशेती करपण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बेळणे खुर्द गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. चेतन चाळके आणि रामकृष्ण चाळके यांच्या शेतातील भातपिकाची पाहणी करून उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता शेती, विहिरी तसेच पाण्याची उपलब्धता याबाबतची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाभर पाहणी दौरे सुरू आहेत. बाधित शेतकऱ्यांना शासनाची मदत योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून सरसकट आणि जास्तीत जास्त मदत देण्यास प्राधान्य राहील. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी शासन घेईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. पिकांची स्थिती, पाण्याची उपलब्धता आणि शेतीचे झालेले नुकसान याची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून त्यानुसार आवश्यक मदत देण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जात आहे.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्यासह जलसंधारण व लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here