बोरिवलीत २८ ते ३० ऑगस्टदरम्यान ‘कोकणी बाजारपेठ’; कोकणातील उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ

0
18
बोरिवलीत २८ ते ३० ऑगस्टदरम्यान ‘कोकणी बाजारपेठ’; कोकणातील उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ
बोरिवलीत २८ ते ३० ऑगस्टदरम्यान ‘कोकणी बाजारपेठ’; कोकणातील उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ

बोरिवलीत २८ ते ३० ऑगस्टदरम्यान ‘कोकणी बाजारपेठ’; कोकणातील उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई :
कोकणातील उद्योजकांनी साकारलेल्या विविध उत्पादनांना मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘मिशन कोकण साम्राज्य’च्या वतीने ‘कोकणी बाजारपेठ’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही बाजारपेठ दि. २८ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत बोरिवली पश्चिम येथे भरविण्यात येणार असून कांदिवली, बोरिवली, दहिसर तसेच मीरा रोड परिसरातील नागरिकांसाठी ही खरेदीची विशेष पर्वणी ठरणार आहे.
कोकणातील उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ
कोकणातील उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ
या बाजारपेठेत कोकणातील उद्योजकांनी तयार केलेले विविध प्रकारचे घरगुती पदार्थ, आकर्षक दागिने, सुंदर साड्या, कपडे, हस्तकला वस्तू, गिफ्टिंग साहित्य, नैसर्गिक उत्पादने तसेच दैनंदिन वापरातील विविध उपयुक्त वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
‘कोकणी बाजारपेठ’चे आयोजन मनपूर्णा बँ्वेट (वातानुकूलित हॉल), सायली इंटरनॅशनल स्कूल, MHB कॉलनी बस स्टॉपसमोर, गोराई रोड, बोरिवली (पश्चिम) येथे करण्यात आले आहे. बाजारपेठ नागरिकांसाठी दररोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुली राहणार आहे.
कोकणातील स्थानिक उद्योजक, महिला बचतगट तसेच लघुउद्योजकांना आपल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. मुंबईकरांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह ‘कोकणी बाजारपेठेला’ भेट देऊन कोकणातील अस्सल उत्पादनांची खरेदी करावी आणि स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजक श्री. अजय यादव यांनी केले आहे.
स्थळ : मनपूर्णा बँ्वेट, सायली इंटरनॅशनल स्कूलसमोर, MHB कॉलनी बस स्टॉप, गोराई रोड, बोरिवली (पश्चिम)
दिनांक : २८, २९ व ३० ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी १० ते रात्री ९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here