बौद्ध समाजातील संस्थांसाठी अनुदान योजना

0
94
बौद्ध समाजातील संस्थांसाठी अनुदान योजना
बौद्ध समाजातील संस्थांसाठी अनुदान योजना

बौद्ध समाजातील संस्थांसाठी अनुदान योजना

मुंबई l l प्रतिनिधी

अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता ‘बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना’ राबविण्यात येत आहे.

इच्छुक संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज सर्व आवश्यक कागद -पत्रांसह मुंबई शहर, जिल्हाधिकारी कार्यालया -कडे २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे मुंबई शहर जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी व पूर्तता करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम दिनांक ६ मार्च २०२६ निश्चित करण्यात आली आहे. योजनेबाबतचे सविस्तर निकष, अटी व शर्ती महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र. अविवि-२०२४/प्र.क्र.७५/१५/का.६, दिनांक ०७ ऑक्टोबर २०२४ मध्ये उपलब्ध आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here