नारायण राणे रुग्णालयात दाखल

0
23
नारायण राणे रुग्णालयात दाखल
नारायण राणे रुग्णालयात दाखल

नारायण राणे रुग्णालयात दाखल

सिंधुदुर्ग l प्रतिनिधी

भाजपचे नेते आणि खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयाशी संबंधित आजारावर उपचार सुरू असून डॉक्टरां कडून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

कणकवलीतील स्थानिक नगर पंचायत निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या यशा -नंतर आयोजित सत्कार समारंभात भाषण करताना राणे म्हणाले होते, “आता थकलो आहोत, आणि किती करणार याला काही मर्यादा असतात.” याच वेळी त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचे कौतुक करत ते आपापल्या क्षेत्रात यशस्वी असल्याचे सांगितले व “नांदासौख्य भरे” असे आशीर्वाद दिले होते.

दरम्यान, राणे यांच्या तब्येतीबाबत भाजप तसेच अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून चौकशी केली जात असून, अनेकांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना सध्या पूर्ण विश्रांती देण्यात येत आहे. हृदयविकार तज्ज्ञांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. उपचारानंतर प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, पुढील काही दिवस निरीक्षणाखाली ठेवले जाण्याची शक्यता आहे. प्रकृतीबाबत रुग्णालयाकडून अधिकृत वैद्यकीय अहवाल लवकरच जाहीर केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here