ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन

0
62
EDINBURGH, SCOTLAND - OCTOBER 02: Queen Elizabeth II arrives with for the opening of the sixth session of the Scottish Parliament on October 02, 2021 in Edinburgh, Scotland. The ceremony, which opened the new session of the devolved Scottish government, paid tribute to “local heroes” from across Scotland who have supported their communities throughout the coronavirus pandemic. (Photo by Jeff J Mitchell/Getty Images)

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे आज दुपारी बालमोरल येथे निधन झाले. त्या 96 वर्षांच्या होत्या. त्‍या सत्तर वर्षे ब्रिटनच्‍या सम्राज्ञी होत्‍या.राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा राज्याभिषेक 1953 मध्ये झाला. सर्वात जास्त काळ सेवा देणारी ब्रिटीश सम्राज्ञी होत्या

एलिझाबेथ या ब्रिटन आणि इतर 14 देशांच्या महाराणी होत्या. त्यांनी सर्वाधिक काळ ब्रिटनवर राज्य केले. एलिझाबेथ सर्वात जुनी राणी होत्या. इतिहासाच्या अनेक घटना त्यांनी जवळून पाहिल्या आहेत. राणींना महात्मा गांधींनी त्यांच्या लग्नात भेट म्हणून  एक रुमाल दिला होता.

राणी एलिझाबेथ यांना कोरोनाची लागण झाली होती.गेल्या अनेक दिवासांपासून त्या आजारी होत्या.गुरुवारी दुपारी त्यांच्या प्रकृती अस्‍वथ असल्‍यामुळे त्‍या डॉक्टरांच्या देखरेखीखाली होत्‍या.राणी एलिझाबेथ यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली होती. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्यामागे प्रिन्स विल्यम, अँड्र्यू आणि एडवर्ड स्कॉटलंडमधील अ‌ॅबरडीन राजकुमारी ऍनी,आठ नातवंडे आणि 12 पणतू आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here