सिंधुदुर्ग : परतीच्या प्रवासासाठी जादा गाड्यांचे नियोजन

0
79
शिंदे-फडणवीस सरकारकडून ९० हजार एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप पगार नाही ;कुठे आहेत सदावर्ते - पडळकर - महेश तपासे

वेंगुर्ला प्रतिनिधी- गणेशोत्सवासाठी वेंगुर्ला तालुक्यात दाखल झालेल्या मुंबई व पुणे चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी वेंगुर्ला आगार सज्ज झाले आहे. आगारप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव हंगामाचे नियोजन करण्यात आले असून वेंगुर्ला आगारातून जादा आरोंदा, बोरिवली, विरार-मुंबई व पुणे मार्गावर १३ गाड्यांचे बुकींग प्रवाशांकडून करण्यात आले आहे. मुंबई व पुणे येथे जाण्यासाठी ११ सप्टेंबरपर्यंत बुकींगची सुविधा एस.टी.महामंडळामार्फत ठेवण्यात आली असल्याची माहिती स्थानकप्रमुख निलेश वारंग यांनी दिली.

      दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता आरोंदा-परळ, दुपारी ४ वाजता वेंगुर्ला-बोरिवली (या तिन्ही गाड्या कुडाळ-चिपळूण पनवेल-सायनमार्गे जातील), तर दुपारी ४ वाजता वेंगुर्ला-पुणे (तुळस, आंबोली, आजरामार्गे निगडी), सायंकाळी ५ वाजता वेंगुर्ला-पुणे (तुळस, आंबोली, आजरामार्गे विश्रांतवाडी-भोसरी-निगडी) असा प्रवास करतील.

      दि. ७ सप्टेंबर रोजी वेंगुर्ला-विरार ही बस दुपारी ३ वाजता (कुडाळ, चिपळूण, पनवेल, ठाणे, वसईमार्गे जाणार आहे.), आरोंदा-परेल दुपारी ३ वाजता व वेंगुर्ला बोरिवली ही बस दुपारी ४ वाजता (कुडाळ-चिपळूण-पनवेल-सायनमार्गे जातील) या मार्गाने प्रवास करतील. तर वेंगुर्ला-पुणे (तुळस, आंबोली, आजरामार्गे निगडी) दुपारी ४ वाजता व सायंकाळी ५ वाजता (तुळस, आंबोली, आजरामार्गे विश्रांतवाडी-भोसरी-निगडी) असा प्रवास करतील.

      वेंगुर्ला आगाराने चाकरमान्यांच्या परतीसाठी केलेल्या या एस.टी.बस सेवेच्या जादा गाड्यांचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त चाकरमान्यांनी एस.टी.गाड्यांचे बुकींग करावे. अधिक माहितीसाठी ९४२२५८५८५९ यावर संफ साधावा असे आवाहन वेंगुर्ला आगार व्यवस्थापक व बसस्थानक प्रमुख निलेश वारंग यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here