भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
नवी दिल्ली :
भारतीय जनता पक्षाने २३ सप्टेंबर २०२६ रोजी देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांसाठी नवीन प्रदेश प्रभारी व सहप्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या. या संघटनात्मक फेरबदलात राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार बैजयंत जय पांडा यांची महाराष्ट्र प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी अमित मालवीय, सदानंद शेट तानावडे आणि कमलजीत सहरावत यांची महाराष्ट्राच्या सहप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.



