नितेश राणे यांनी News18 मराठीच्या कार्यालयातील गणरायाचे घेतले दर्शन
नितेश राणे यांनी News18 मराठीच्या कार्यालयातील गणरायाचे घेतले दर्शन
मुंबई :
मंत्री नितेश राणे यांनी मुंबईतील News18 मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यालयाला भेट देत तेथे विराजमान श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
यावेळी राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, News18 मराठीचे संपादक मंदार फणसे आणि प्रशांत बाग उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर News18 मराठीच्या कार्यालयात विराजमान गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर उपस्थितांशी संवादही झाला.