मुरबाडमध्ये अंगणवाडी सेविकांना बाल संरक्षण समितीबाबत प्रशिक्षण
मुरबाडमध्ये अंगणवाडी सेविकांना बाल संरक्षण समितीबाबत प्रशिक्षण
मुरबाड :
पोषण माह २०२६ आणि सेवा संकल्प अभियानांतर्गत “समुदाय सहभाग, स्वामित्व व उत्तरदायित्व” या संकल्पनेनुसार पंचायत समिती मुरबाड येथील शांताराम भाऊ घोलप सभागृहात अंगणवाडी सेविकांसाठी बाल संरक्षण समितीबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
या प्रशिक्षणात CCDT संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर रामेश्वर भाले यांनी बालकांचे हक्क व अधिकार, बाल संरक्षण तसेच बालकांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. बाल संरक्षण समितीची स्थापना, समितीतील किमान ९ आणि कमाल ११ सदस्यसंख्या तसेच ग्रामपंचायत स्तरावर बालविवाह प्रतिबंधासाठी जनजागृती करण्याच्या आवश्यकतेबाबत माहिती देण्यात आली.
बालकांच्या सुरक्षिततेसाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय आणि समुदायाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रशिक्षणातून अधोरेखित करण्यात आले. तसेच परिसरात बालविवाहाची माहिती मिळाल्यास तात्काळ चाइल्ड हेल्पलाइन १०९८ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.