महाडमध्ये ‘लोकसंवाद-२०२६’मधून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती

0
13
महाडमध्ये ‘लोकसंवाद-२०२६’मधून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती
महाडमध्ये ‘लोकसंवाद-२०२६’मधून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती

महाडमध्ये ‘लोकसंवाद-२०२६’मधून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती

महाड :
रोहिदास तरुण विकास मंडळ, महाड येथे आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ कार्यक्रमातून नागरिकांना विविध शासकीय योजना आणि डिजिटल सेवांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी निवासी नायब तहसीलदार बी. वाय. भाबड यांनी नागरिकांना शेती नुकसान भरपाईसाठी आवश्यक e-KYC, ई-पिक पाहणी, SIR, ऑग्रीस्टॅक, पीएम किसान योजना तसेच पानंद रस्ता याबाबत माहिती दिली. संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आणि शासकीय सेवांचा योग्य पद्धतीने वापर करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवांची माहिती एकाच ठिकाणी मिळण्यास मदत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here