भाजपाचे माजी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे अकस्मात निधन

0
8

नितेश राणेंकडून श्रद्धांजली

रत्नागिरी, दि. ६ ऑगस्ट :
भाजपाचे माजी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या अकस्मात निधनाबद्दल राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
नितेश राणे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी राजेश सावंत यांनी समर्पित भावनेने कार्य केले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे आणि संघटन कौशल्यामुळे पक्षाला मोठे बळ मिळाले.
राजेश सावंत यांचा स्पष्टवक्तेपणा, कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा आणि नेतृत्वगुण यामुळे त्यांनी पक्षात आणि समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने एक निष्ठावान, कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय नेतृत्व हरपल्याची भावना नितेश राणे यांनी व्यक्त केली.
राजेश सावंत यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो तसेच सावंत कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना नितेश राणे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here