भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत घबाड सापडलं; निलेश राणे आक्रमक
मालवण
मतदानापूर्वीची रात्र वादग्रस्त ठरली असून, मालवणध्ये पोलिसांना नाकाबंदीत एका कारमध्ये दीड लाख रुपयांची रोकड सापडली. या प्रकारानंतर मालवणमधील वातावरण प्रचंड तापले होते.
हे पण वाचा मतदानाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत पालकमंत्र्यांकडून बुथची पाहणी.
आज सकाळी ७.३० वाजल्यापासून राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे. काही नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला. काल मध्यरात्री सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. मतदानापूर्वीची रात्र वादग्रस्त ठरली असून, मालवणध्ये पोलिसांना नाकाबंदीत एका कारमध्ये दीड लाख रुपयांची रोकड सापडली. या प्रकारानंतर मालवणमधील वातावरण प्रचंड तापले होते. या प्रकरणी शिवसेना आमदार निलेश राणे यांनी स्वतः मालवण पोलीस स्टेशनमध्ये जात ठिय्या देत कारवाईची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी संबंधितांवर सुमोटोअंतर्गत कारवाई केली असल्याचे सांगितले आहे. मात्र, या रोकड प्रकरणावरून निलेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे.
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने रात्री १० वाजेपर्यंत प्रचाराची मुभा दिली होती. थोडक्यात १० वाजता प्रचारतोफा थंडावल्या. त्यानंतर आज २ डिसेंबर रोजी मतदानाला सुरूवात झाली. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये पोलिसांना नाकबंदीत एका कारमध्ये दीड लाख रुपयांची रोकड तपासणीवेळी सापडली. साधारण ही घटना रात्री बारा वाजण्याचा सुमारास घडली असल्याचे आमदार निलेश राणे यांचे म्हणणे आहे. मालवण नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान होत असून, काल मध्यरात्री साडपलेल्या रोकडमुळे असून, काल मध्यरात्री साडपलेल्या रोकडमुळे सर्वत्र या प्रकाराची चर्चा आहे. निलेश राणे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे वाटल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पुन्हा एकादा भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत रोकड सापडल्याने अनेक चर्चा सुरू झाली आहेत.
निलेश राणे काय म्हणाले?
“साधारण मी दीड वाजण्याच्या सुमारास आलो. मालवणमध्ये जो काही स्पेशल स्कॉड असतो, त्या स्कॉडमध्ये एक गाडी पकडली सर्चमध्ये. त्यांना दीड लाख रुपये मिळाले. ही गाडी भारतीय जनता पक्ष देवगड तालुका अध्यक्षाची आहे. महेश नारकर. प्रचाराची डेडलाईन १० वाजता होती. हे १२ वाजण्याच्या सुमारास पकडले गेले. मी पोलीस चौकीत सव्वा एक वाजण्याच्या सुमारास आलो. पण त्या एका तासात साधी एफआरआय नाही, असा आरोप निलेश राणे यांनी केला. पकडलेल्या गाडीला नंबरप्लेट नाही, त्यानंतर त्यांनी पोलिसांनी कारवाईत जप्त केलेल्या दोन गाड्या दाखवत, ज्या गाडीत रोकड सापडली. त्या गाडीच्या आतमध्ये भाजपचा गमछा असल्याचे दाखवले. दुसरा एक पदाधिकारी बाबा परब आला होता, पोलीस आणि त्याच्यांत मांडवली झाली. तो व्हिडीओ माझ्याकडे असल्याचा मोठा दावा निलेश राणे यांनी केला आहे. रोकड प्रकरणी मालवण पोलिसांनी सुमोटो अंतर्गत कारवाई केली आहे.


