मतदाना दिवशी पैसे वाटप केल्याच्या रागातून सावंतवाडीत धक्काबुक्की

0
146
मतदाना दिवशी पैसे वाटप केल्याच्या रागातून सावंतवाडीत धक्काबुक्की
मतदाना दिवशी पैसे वाटप केल्याच्या रागातून सावंतवाडीत धक्काबुक्की

मतदाना दिवशी पैसे वाटप केल्याच्या रागातून सावंतवाडीत धक्काबुक्की

सावंतवाडी,

मतदाना दिवशी पैसे वाटप वाटप केल्याच्या संशयावरून भाजप व शिवसेनेच्या दोन गटात जोरदार धक्काबुक्की झाली. यात एकामेकांच्या कॉलरला पकडण्याचा प्रकार घडला. मात्र हा वाद त्याच ठिकाणी मिटवण्यात आला. ही घटना आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास प्रभाग क्रमांक ७ मध्ये घडली.

हे पण वाचा मतदानाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत पालकमंत्र्यांकडून बुथची पाहणी.

याबाबत पोलीस ठाण्यापर्यंत कोणताही प्रकार आलेला नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे शहरात जोरदार चर्चा सुरू होती. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब हे उभे राहिले आहेत. त्यांच्या विरोधात भाजपाचे माजी नगरसेवक उदय नाईक आपले नशीब आजमावत आहेत. या सर्व घडामोडीनंतर आज मतदानाच्या दिवशी मतदारांना नाष्टा करण्यासाठी ५०० ते १००० रुपये भाजपच्या मंडळीकडून दिले जात होते, असा आरोप करत शिवसेनेचा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पैसे वाटप करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर वॉच ठेवला. यावेळी पैसे वाटप करताना काही लोकांना पकडण्यात आले. यावेळी त्यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली.

शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यातील पदाधिकाऱ्यांच्या कॉलरला धरण्याचा प्रकार केला. या प्रकारानंतर त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली. मात्र काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणावर पडदा टाकला. हा व्हिडिओ काही लोकांनी काढून थेट सोशल मीडियावर टाकला. त्यामुळे हा प्रकार उघड झाला. सावंतवाडी पोलिसांशी संपर्क साधला असता असा कोणताही प्रकार आपल्यापर्यंत आलेला नाही, असे सांगून त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. तर शिवसेनेचाया पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कार्यकर्ते हे बाहेरून आलेले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here