मंत्रालयात २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर खादी व ग्रामोद्योग वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
मंत्रालयात २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर खादी व ग्रामोद्योग वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
मुंबई :
महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण, मुख्य इमारत येथे खादी व ग्रामोद्योग वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे. हे प्रदर्शन २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, आयएएस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या उपक्रमातून खादी तसेच ग्रामोद्योग क्षेत्रातील विविध उत्पादने नागरिकांना एकाच ठिकाणी पाहता व खरेदी करता येणार आहेत.
ग्रामीण भागातील कारागीर, लघुउद्योजक आणि ग्रामोद्योगांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अशा प्रदर्शनांचे महत्त्व आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन खादी व ग्रामोद्योग वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.