रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुकेही दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करणार – पालकमंत्री उदय सामंत

0
11
रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुकेही दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करणार -  पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुकेही दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करणार -  पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुकेही दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करणार –  पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी :
राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निश्चित करण्यात आली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील उर्वरित सहा तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश व्हावा, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार, सन २०२६ च्या खरीप हंगामात पावसाची तूट आणि इतर संबंधित घटकांच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निश्चित करणारी ‘प्रथम कळ’ (Trigger-1) लागू करण्यात आली आहे.
शासन निर्णयातील परिशिष्ट-१ नुसार रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांमध्ये Trigger-1 लागू झाला आहे. या तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पंचनामे आणि सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन बाधित तालुक्यांमध्ये आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील उर्वरित सहा तालुक्यांमध्येही दुष्काळी परिस्थितीचा विचार करून त्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये करण्यात यावा, यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत शासनाकडे पाठपुरावा करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here