मतदार गणना अर्ज (EF) कसा भरावा? निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना

0
17
मतदार गणना अर्ज (EF) कसा भरावा? निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना
मतदार गणना अर्ज (EF) कसा भरावा? निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना

मतदार गणना अर्ज (EF) कसा भरावा? निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना

मुंबई, दि. २३ :
मतदार यादी अद्ययावत करण्याच्या विशेष मोहिमेअंतर्गत मतदार गणना अर्ज (Enumeration Form – EF) भरण्यासंदर्भात भारत निवडणूक आयोगाने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
मार्गदर्शक सूचनांनुसार, गणना अर्ज काळजीपूर्वक भरून त्याची एक प्रत संबंधित बूथस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे जमा करावी, तर दुसरी प्रत स्वतःकडे सुरक्षित ठेवावी.
तसेच, मागील विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेमध्ये संबंधित मतदाराचा तपशील उपलब्ध न झाल्यास, अशा नागरिकांनी फक्त भाग क्रमांक ३ भरून, त्यावर स्वाक्षरी करून अर्ज बीएलओकडे जमा करावा. यासोबत भारत निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या कोणत्याही एका ओळख किंवा पात्रता दर्शविणाऱ्या कागदपत्राची तयारी ठेवावी, असेही सूचित करण्यात आले आहे.
मतदारांना अर्ज भरण्याबाबत किंवा प्रक्रियेसंदर्भात कोणतीही शंका असल्यास मतदार हेल्पलाइन क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क साधावा किंवा संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (ERO) कार्यालयाला भेट द्यावी. तसेच, घरभेटीदरम्यान येणाऱ्या BLO अधिकाऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here