मतदार गणना प्रपत्रांचे १०० टक्के डिजिटायझेशन; रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल

0
17
मतदार गणना प्रपत्रांचे १०० टक्के डिजिटायझेशन; रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल
मतदार गणना प्रपत्रांचे १०० टक्के डिजिटायझेशन; रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल

मतदार गणना प्रपत्रांचे १०० टक्के डिजिटायझेशन; रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल

रत्नागिरी, प्रतिनिधी :
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांना घरपोच गणना प्रपत्र (Enumeration Form) वाटप करून त्याचे १०० टक्के डिजिटायझेशन पूर्ण करण्यात रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाच्या १४ मे २०२६ रोजीच्या निर्देशानुसार राज्यभर विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ३० जून २०२६ पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत घरोघरी जाऊन मतदारांना गणना प्रपत्रांचे वाटप व संकलन करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये हे काम अत्यंत नियोजनबद्ध आणि वेगाने पूर्ण करण्यात आले. परिणामी, गणना प्रपत्रांचे १०० टक्के डिजिटायझेशन पूर्ण करणारा रत्नागिरी जिल्हा राज्यातील अव्वल जिल्हा ठरला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकारी आणि त्यांच्या पथकाचे प्रशासनाकडून विशेष कौतुक करण्यात आले आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय अधिकारी
  • २६३-दापोली : डॉ. विजयकुमार सूर्यवंशी
  • २६४-गुहागर : वैशाली पाटील
  • २६५-चिपळूण : आकाश लिगाडे
  • २६६-रत्नागिरी : जीवन देसाई
  • २६७-राजापूर : विश्वजीत गाताडे
या ऐतिहासिक कामगिरीमध्ये मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक व अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, तहसीलदार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), सहाय्यक अधिकारी (ABLO), पर्यवेक्षक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या परिश्रमाचा व समन्वयाचा मोठा वाटा असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here