वाढदिवसाचा खर्च टाळून माजी सैनिक प्रसाद राणे यांची ध्वजदिन निधीस ५,२०० रुपयांची देणगी

0
13

मालवण, प्रतिनिधी :
सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा आदर्शवत उपक्रम राबवत माजी सैनिक प्रसाद नरहरी राणे (रा. तळगाव-राणेवाडी, ता. मालवण) यांनी आपल्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून ध्वजदिन निधी संकलन-२०२५ साठी ५,२०० रुपयांची वैयक्तिक देणगी दिली.
सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत दरवर्षी शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी तसेच अपंग माजी सैनिक आणि वीरनारींच्या पुनर्वसनासाठी ध्वजदिन निधी संकलित करण्यात येतो. या उपक्रमाला हातभार लावत प्रसाद राणे यांनी ही देणगी प्रदान केली.
याप्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते प्रसाद राणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वाढदिवस सामाजिक उत्तरदायित्व जपत साजरा करण्याच्या त्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत मच्छिंद्र सुकटे यांनी त्यांच्या या स्तुत्य योगदानाबद्दल प्रशंसा व्यक्त केली आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मच्छिंद्र सुकटे यांनी जिल्ह्यातील नागरिक, माजी सैनिक आणि विविध सामाजिक संस्थांनी ध्वजदिन निधीस सढळ हस्ते योगदान देऊन शहीद जवानांच्या कुटुंबीयांसह अपंग माजी सैनिक आणि वीरनारींच्या कल्याणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास प्रभारी सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लक्ष्मण कोळी तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here