मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील विकास प्रकल्प व योजनांचा मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अध्यक्षतेखाली मत्स्यव्यवसाय क्षेत्राशी संबंधित विविध विकास प्रकल्प, कल्याणकारी योजना आणि त्यांची अंमलबजावणी याबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
बैठकीस पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन.रामास्वामी (N. Ramaswamy), मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार (Prerana Deshbhratar) तसेच महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (Maharashtra Fisheries Development Corporation) चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले (Prakash Khaple) यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना अंतर्गत विभागीय प्रशिक्षण केंद्रांची स्थापना, आंतरराज्य अभ्यास दौरे, आधुनिक मत्स्यबाजार उभारणी, निमखाऱ्या पाण्यात सुपर-इंटेन्सिव्ह कोळंबी संवर्धन, समुद्री शैवाळ बीज निर्मिती केंद्र उभारणी तसेच मासळी उतरविण्याची केंद्रे, बंदरे आणि जेट्टी दुरुस्ती यासंबंधीच्या राज्यस्तरीय योजनांच्या सविस्तर प्रकल्प अहवालांचा आढावा घेण्यात आला.
जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष मदत पॅकेजची अंमलबजावणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तसेच ‘ड्रोन-आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा व्यवस्थापन प्रकल्प’ अधिक प्रभावी करण्यासाठी एका आठवड्याच्या आत सर्वसमावेशक डॅशबोर्ड विकसित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यामुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील माहिती व्यवस्थापन, देखरेख आणि निर्णय प्रक्रिया अधिक सक्षम होणार आहे.
बैठकीत ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने’अंतर्गत ‘सागर मित्र’ (Pradhan Mantri Matsya Sampada Yojana) अंतर्गत ‘सागर मित्र’ नियुक्ती प्रक्रियेचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.