आवास–रेवदंडा किनारपट्टी परिसरातील वाढत्या वीज मागणीबाबत ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची बैठक

0
4

आवास–रेवदंडा किनारपट्टी परिसरातील वाढत्या वीज मागणीबाबत ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची बैठक

उर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर (Meghna Sakore-Bordikar ) यांनी आवास ते रेवदंडा किनारपट्टी परिसरातील वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या कार्यालयात आढावा बैठक घेतली.
बैठकीत रायगड जिल्ह्यातील महावितरणची प्रलंबित व अपूर्ण कामे मान्सूनपूर्वी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. पावसाळ्यापूर्वी वीज यंत्रणा सक्षम करण्यावर विशेष भर देण्याचेही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
अलिबाग तालुक्यातील आवास ते रेवदंडा परिसरात ग्राहकांची संख्या वाढत असल्याने महावितरणने विशेष शिबिरांचे आयोजन करून नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
तसेच या किनारपट्टी भागातील वाढत्या वीज वापराचा विचार करून १०० केव्ही क्षमतेचे २५ नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे वीज पुरवठा अधिक सुरळीत होण्यास आणि वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.
बैठकीत स्थानिक नागरिकांना दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here