मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवतीर्थावर; राज ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष

0
16
मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवतीर्थावर; राज ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष
मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवतीर्थावर; राज ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष

मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवतीर्थावर; राज ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)चा पारंपरिक गुढीपाडवा मेळावा आज दादर येथील शिवतीर्थ मैदानावर सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे मार्गदर्शन होणार असून त्यांच्या भाषणाकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी मनसेकडून हा मेळावा मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो. यंदाही मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समर्थक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थ परिसरात पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून वाहतूक व्यवस्थेतही आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here