मनसेची निवडणूक कार्यालयात तोडफोड

0
149
मनसेची निवडणूक कार्यालयात तोडफोड
मनसेची निवडणूक कार्यालयात तोडफोड

मनसेची निवडणूक कार्यालयात तोडफोड

ठाणे

कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील घोळाबाबत वारंवार तक्रारी करूनही निवडणूक प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याच्या आरोपावरून मनसे कार्यकर्त्यांनी कळवा येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड केल्याची घटना घडली. अपुरी कर्मचारी संख्यासंथ आणि निष्क्रिय प्रणाली तसेच मतदार यादीतील गंभीर त्रुटींमुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतला आणि अखेर संतापाचा उद्रेक तोडफोडीतून झाला.

सकाळपासूनच मनसेचे कार्यकर्ते कळवा येथील मुम्रा विधानसभा निवडणूक कार्यालयात उपस्थित होते. मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर दुबार नावेमृत मतदारांची नावे कायम असणेतसेच जिथे प्रत्यक्षात सपाट मोकळी जमीन आहे तिथे इमारती दाखवून मतदार नोंद झाल्याच्या तक्रारी घेऊन मनसे वारंवार या कार्यालयात येत होती. मात्रया गंभीर आक्षेपांवर निवडणूक कार्यालयाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.

आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका अधिकाऱ्याने पुढाकार घेततक्रारींचे निराकरण कशा पद्धतीने केले जात आहेहे संगणक प्रणालीद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्रत्यावेळी निवडणूक आयोगाची अधिकृत प्रणाली व संकेतस्थळ पूर्णपणे कार्यरत नसल्याचे समोर आले. सरकारी यंत्रणांची ही असमर्थता आणि निष्क्रियता पाहून मनसे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला.

सिस्टम न चालणेवारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न होणे आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सामान्य नागरिकांची कुचंबणा होत असल्याच्या रागातून मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयातील संगणक आणि काही साहित्याची तोडफोड केली. कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दुबार मतदारमृत व्यक्तींची नावे आणि संशयास्पद पत्त्यांवर नोंदवलेली मतदार नावे या मुद्द्यांवरून मनसैनिकांनी जोरदार संताप व्यक्त केला.

मनसेकडून असा आरोप करण्यात येत आहे की नगरपरिषदजिल्हा परिषदविधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्येही याच प्रकारच्या मतदार यादीतील गोंधळामुळे सातत्याने प्रश्न उपस्थित होत आले आहेत. या संदर्भात यापूर्वीही विविध विरोधी पक्षांनी दिल्लीपर्यंत आवाज उठवला होता. मात्रतरीही मतदार यादीतील त्रुटी कायम असल्याने लोकशाही प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

दरम्यानआज सायंकाळी चार वाजता राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार असूनत्याच्या पार्श्वभूमीवर कळवा येथील निवडणूक कार्यालयात घडलेली तोडफोडीची घटना गंभीर मानली जात आहे. या घटनेमुळे निवडणूक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि मतदार यादी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर पुन्हा एकदा तीव्र चर्चा सुरू झाली आहे. तोडफोड ही कायद्याने चुकीची असली तरीत्यामागील कारणे आणि प्रशासनाच्या अपयशाकडे दुर्लक्ष करता येणार नाहीअशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here