‘मराठी भाषा भवन’ प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी

0
19
‘मराठी भाषा भवन’ प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी
‘मराठी भाषा भवन’ प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी

‘मराठी भाषा भवन’ प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी

मुंबईतील Marine Drive येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य ‘मराठी भाषा भवन’ प्रकल्पाच्या बांधकाम स्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन कामाच्या प्रगतीची सविस्तर पाहणी करण्यात आली.

मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि तिचा गौरवशाली इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे. हे भवन केवळ एक वास्तू नसून मराठी भाषेची समृद्ध परंपरा, सांस्कृतिक वारसा, साहित्य आणि ज्ञानसंस्कृतीचे जागतिक केंद्र म्हणून विकसित होणार आहे.
यावेळी प्रकल्पाच्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला तसेच दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या.
पाहणी दौऱ्यावेळी  आमदार श्री. प्रकाशजी सुर्वे (Prakash Surve), मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले (Dr. Namdev Bhosale), उपसचिव, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक, संचालक श्री. अरुण गीते
(State Marathi Development Institute चे संचालक Arun Gite), संचालक श्री. रूपेंद्र मोरे (Rupendra More), विश्वकोशचे सचिव श्री. देवरे (Deore),  तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मराठी भाषा भवन हे मराठी भाषेच्या अस्मितेचे, साहित्यिक वैभवाचे आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक ठरणार असून भविष्यात संशोधन, अभ्यास आणि सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्वाचे केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here