लेक लाडकी योजना : मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाचा भक्कम आधार

0
14
लेक लाडकी योजना : मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाचा भक्कम आधार
लेक लाडकी योजना : मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाचा भक्कम आधार

लेक लाडकी योजना : मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाचा भक्कम आधार

मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, त्यांचे शिक्षण, आरोग्य आणि सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत ‘लेक लाडकी योजना’ राबविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना टप्प्याटप्प्याने एकूण ₹१ लाख १ हजारांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
योजनेनुसार मुलीच्या जन्मानंतर ₹५,०००, इयत्ता पहिलीत ₹६,०००, सहावीत ₹७,०००, अकरावीत ₹८,००० आणि लाभार्थी मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर ₹७५,००० अशी आर्थिक मदत देण्यात येते.
या योजनेचा प्रमुख उद्देश मुलींच्या जन्मदरात वाढ करणे, शिक्षणाला प्रोत्साहन देणे, बालविवाहाला आळा घालणे, कुपोषण कमी करणे तसेच शाळाबाह्य मुलींचे प्रमाण कमी करणे हा आहे.
“मुलगी आहे घराची शान, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाचा भक्कम आधार” या संकल्पनेतून राबविण्यात येणारी ही योजना मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here